Home > Politics > अमरावती मनपाने भाजपला 4.80 लाखाची देणगी दिल्याचा ADR चा दावा

अमरावती मनपाने भाजपला 4.80 लाखाची देणगी दिल्याचा ADR चा दावा

अमरावती महापालिकेने भाजपला 4.80 लाख रुपये देणगी दिली असल्याचा धक्कादायक दावा असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मस या संस्थेच्या अहवालात करण्यात आला आहे. यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

अमरावती मनपाने भाजपला 4.80 लाखाची देणगी दिल्याचा ADR चा दावा
X

अमरावती: अमरावती महापालिकेने भाजपला 4.80 लाख रुपये देणगी दिली असल्याचा धक्कादायक दावा असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मस या संस्थेच्या अहवालात करण्यात आला आहे. 2019-20 या काळात भाजपला 20 हजार कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या असून, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून अमरावती महापालिकेने राजकीय पक्षाला देणगी का दिली असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. मात्र, अमरावतीच्या महापौरांनी हा दावा तथ्यहीन आल्याचे म्हटले आहे.

2019 मध्ये कोल्हापूरला पुराचा तडाखा बसला होता. त्यावेळी कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना अमरावती महापालिकेतील सर्व सदस्यांनी एक महिन्याचे मानधन मदत निधी म्हणून देण्यासंदर्भात 16 ऑगस्ट 2019 च्या सर्वसाधारण सभेसमोर प्रस्ताव ठेवण्यात आला होता. या प्रस्तवाला सभागृहाने मंजुरी दिली होती. दरम्यान, काँग्रेस, शिवसेना, बसपा, एआएमआयएम, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या नगरसेवकांनी आपले एक महिन्याचे मानधन मुख्यमंत्री मदत कोशात दिले होते. मात्र, भाजपच्या 48 नगरसेवकांनी आपले एक महिन्याचे मानधन भारतीय जनता पक्ष आपत्ती कोशात स्वेच्छेने देण्याबाबत महापालिका प्रशासनला ठराव करून सांगितले होते. दरम्यान हा निधी 'महापालिकेचा निधी नाही, तर आमचे मानधन आहे' असं महापौरांनी म्हटलं आहे.

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मस विविध राजकीय पक्षांना देणगी स्वरूपात प्राप्त निधीचा अहवाल जाहीर करताना त्यात अमरावती महापालिकेकडून भाजपला 4.80 लाख रुपयांची देणगी मिळाल्याचे म्हणले आहे. वास्तवात अमरावती महापालिकेने आमच्या पक्षाला कोणतीही देणगी दिली नाही. भाजपच्या नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन कोल्हापूर पूरग्रस्तांना थेट महापालिका प्रशासनाने भाजपच्या आपत्ती कोषात वर्ग केले होते. महापालिकेकडून जी रक्कम गेली ती महापालिकेचा निधी नसून, भाजपच्या 48 नगरसेवकांच्या मानधनाची ती रक्कम होती, असे अमरावतीचे महापौर चेतन गावंडे यांनी स्पष्ट केले.

Updated : 6 Aug 2021 5:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top