Home News Update दोन देशमुख लातुरच्या रिंगणात…

दोन देशमुख लातुरच्या रिंगणात…

कॉग्रेसवर घराणेशाहीचा नेहमीच आरोप होतो. कॉंग्रेस नेहमी काही घराण्यांना सोबत घेऊन राजकारण करते.सर्वसामान्यांना संधी देत नाही. अशी चर्चा नेहमीच माध्यमांमध्ये सुरु असते. विधानसभेच्या निमित्ताने कॉग्रेसने ही परंपरा कायम ठेवली आहे. कॉंग्रेसने पक्षाचे राष्ट्रीय सचिव व लातूर शहराचे विद्यमान आमदार अमित देशमुख यांच्यासह लातूर ग्रामीण मतदारसंघातून विद्यमान आमदार त्र्यंबक भिसे यांचा पत्ता कट केला आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे कनिष्ठ चिरंजीव जिल्हा परिषद सदस्य धीरज देशमुख यांना उमेदवारी दिली आहे.

राज्याच्या राजकारणात पहिल्यादांच एका माजी मुख्यमंत्र्यांच्या दोनही मुलांना उमेदवारी मिळाली आहे.
मॅक्समहाराष्ट्रच्या प्रतिनिधी प्रियदर्शीनी हिंगे यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या या दोनही मुलांशी घराणेशाही ते स्थानिक राजकारण या विषयावर थेट चर्चा केली. पाहा टू द पॉइंटमध्ये लातूरच्या राजकारणातील

‘दोन देशमुखांशी थेट संवाद’

Support MaxMaharashtra

 


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997