Home News Update भाजपच्या कार्यकर्त्यांची राहुल गांधींविरोधात घोषणाबाजी

भाजपच्या कार्यकर्त्यांची राहुल गांधींविरोधात घोषणाबाजी

courtesy - social media
Support MaxMaharashtra

भारतीय जनता पक्षाच्या (BJP) मुंबईतील मुख्य कार्यालयावर भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul gandhi)यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. लोकसभा निवडणुकीदरम्यान राहुल गांधी यांनी राफेल प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi)  यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला होता. राहुल गांधी राफेल (Rafale) संदर्भात देशासमोर वारंवार खोटं बोलत होते असा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला.

हे ही वाचा…

२०१८-१९ या वर्षात भाजपला मिळाली ७०० कोटींहून अधिकची देणगी

अर्थज्ञान : जगाच्या आर्थिक नाड्या हातात असलेल्या तीन संस्था कोणत्या?

सामना अग्रलेख : फडणवीस आणि भाजपवर सडकून टीका

दोन दिवसांपूर्वी राफेल प्रकरणातली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. यावेळी राहुल गांधींनी कोर्टाची माफी मागितली. त्याचप्रमाणे राहुल यांनी देशाच्या जनतेची माफी मागावी या मागणीसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा मोर्चा काढला. जोपर्यंत राहुल गांधी देशाची माफी मागत नाही तोपर्यंत संपूर्ण देशात निषेध मोर्चे सुरूच रहातील असा इशारा भाजप कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

 

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997