Home News Update भाजपाची 288 जागांवर लढायची तयारी

भाजपाची 288 जागांवर लढायची तयारी

येत्या विधानसभा निवडणुकीत 288 जागांवर निवडणूक लढायची तयारी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी चालवलेली आहे. शिवसेनेने सत्तेचं समसमान वाटप करण्याबाबत भूमिका घेतली आहे. शिवसेनेने तर आपले नेते आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करायला सुरूवात केली आहे. अशा वेळी मुख्यमंत्री भाजपाचाच असणार आहे, आणि ते ही देवेंद्र फडणवीसच असतील असं भाजपाने ठणकावून सांगितलं आहे.

युती होईल की नाही या वादात न पडता कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात जाऊन बूथ पातळीवर जाऊन काम करायचंय. लोकसभा निवडणुकीत 52 टक्के मतं मिळाली होती, हाच परफॉर्मन्स कायम ठेवायचा आहे. 288 जागांवर लढून मुख्यमंत्री भाजपाचा बनवायचा आहे, असं भाजपाच्या महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे यांनी म्हटलं.

तर 288 जागांवर तयारी करा असा आदेश भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. युती होईलच मात्र 288 जागांवर आपली तयारी असली पाहिजे. भाजपाचा मुख्यमंत्री करायचा असल्यास मित्रपक्षही निवडून यायला हवेत असं सांगतानाच आपली शक्ती वाढवली पाहिजे असा संदेश चंद्रकांत दादा पाटलांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997