Home News Update सावरकरांचा अपमान तरीही उद्धव ठाकरे शांत का?- किरीट सोमय्या

सावरकरांचा अपमान तरीही उद्धव ठाकरे शांत का?- किरीट सोमय्या

Support MaxMaharashtra

भाजप (BJP) आणि कॉंग्रेस मधील (Congress) सावरकरवाद पुन्हा उफाळला असून महाराष्ट्र कॉंग्रेसचे मुखपत्र ‘जनमानसाची शिदोरी’ (Shidori) या मासिकातून सावकरांबद्दल अपहार्य लेख लिहिण्यावरुन वाद निर्माण झाला आहे. शिदोरीमधील या लेखात सावरकरांचा (Savarkar) माफीवीर असा उल्लेख केला असल्याने भाजपकडून कॉंग्रेसवर टीका केली जातेय. कॉंग्रेसकडून सातत्याने महापुरुषांचा अपमान केला जात असल्याने भाजप नेते किरीट सोमय्या आणि राम कदम यांच्या नेतृत्वात मुंबईत निदर्शनं केली जात आहेत.

संबंधित बातम्या…

या वादात शिनसेनेलाही लक्ष्य करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातोय. “कॉंग्रेस कधी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा पाडते तर, कधी सावरकरांना माफीवीर संबोधते तरीही यावर उद्धव ठाकरे एकही शब्द बोलत नाहीत. महाराष्ट्र सरकार कोणतीही कारवाई करत नाही.” अशी टीका किरीट सोमय्या (kirit somaiya)  यांनी केली आहे.

सावरकरांचा अपमान तरीही उद्धव ठाकरे शांत का?- किरीट सोमय्या

भाजप आणि कॉंग्रेसमधील सावरकरवाद पुन्हा उफाळला असून महाराष्ट्र कॉंग्रेसचे मुखपत्र ‘जनमानसाची शिदोरी’ या मासिकातून सावकरांबद्दल अपहार्य लेख लिहिण्यावरुन वाद निर्माण झाला आहे. याविरोधात भाजपकडून निदर्शनं केली जात आहेत.. पाहा व्हिडीओ#MaxMaharashtra

Maxmaharashtra द्वारा इस दिन पोस्ट की गई शुक्रवार, 14 फ़रवरी 2020

शिदोरीमधील सावरकरांची बदनामी केलेल्या लेखामुळे सावरकरप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. राज्य सरकारने शिदोरी मुखपत्र जप्त करुन त्या मुखपत्राच्या संपादकाला अटक करावी अशी मागणी भाजप नेते राम कदम यांनी केली आहे. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही निदर्शनं चालू ठेवणार असा इशाराही भाजपने दिलाय.

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997