भाजपा अध्यक्षपदी जे. पी. नड्डा ?

भाजपा अध्यक्षपदी जे. पी. नड्डा ?

भाजपचे अध्यक्षपद लवकरच सोडण्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ठाम असून, महाराष्ट्र, हरयाणा आणि झारखंड या राज्यांच्या विधानसभा निवडणुका होईपर्यंत त्या पदावर राहण्याचा प्रस्ताव त्यांनी अमान्य केला असल्याचे कळते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्याकडे सोपवलेली गृह खात्याची जबाबदारी पार पाडण्याकडे मला लक्ष द्यायचे असल्याने अध्यक्षपद अन्य व्यक्तीकडे देण्यात यावे, अशी भूमिका त्यांनी घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. नव्या अध्यक्षाबाबत चर्चा सुरू झाली असून, त्यात माजी आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांचे नाव आघाडीवर आहे.
कोण आहेत जे. पी. नड्डा ?
उत्तर प्रदेशातील ८० पैकी ६२ जागा जिंकून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. ते संघाचे कट्टर स्वयंसेवक असून, अभाविपमध्येही ते सक्रिय होते. अमित शहा यांनी महाराष्ट्रासह तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका होईपर्यंत पक्षाध्यक्षपदी राहावे, अशी पक्षातील अनेक नेत्यांची इच्छा आहे. पण शाह त्यासाठी तयारी नाहीयेत. तिन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुका नव्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली व्हाव्यात, असे त्यांचे म्हणणे असल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले.
भाजपमध्ये जे. पी. नड्डा यांच्याखेरीज अन्य नावही नाही. पक्षाचे सरचिटणीस आणि राज्यसभा सदस्य भूपेंद्र यादव यांचे नाव चर्चिले गेले असले आणि पक्ष नेतृत्वावर प्रभाव टाकण्यात ते यशस्वी ठरले असले तरी एवढ्या मोठ्या व महत्त्वाच्या पदासाठी त्यांचा आता विचार होणे अवघड दिसत आहे.