Home News Update पंकजा मुंडे उपोषण करणार…

पंकजा मुंडे उपोषण करणार…

Courtesy : PTI
मराठवाड्याला हक्काचं पाणी मिळावं म्हणून माजी मंत्री पंकजा मुंडे 27 जानेवारीला (सोमवारी) औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार आहे. या संदर्भात भाजप प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांनी माहिती दिली आहे.
मराठवाडा हा कायम दुष्काळग्रस्त राहिलेला आहे. या भागाकडे महाविकास आघाडीने लक्ष द्यावं. यासाठी पंकजा मुंडे लाक्षणिक उपोषण करणार आहेत. उपोषणाच्या वेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार हरिभाऊ बागडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित राहणार आहेत.

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997