Home News Update भाजपा नगरसेविकेकडून पूरग्रस्त, कार्यकर्ते आणि पत्रकारांना मारहाण

भाजपा नगरसेविकेकडून पूरग्रस्त, कार्यकर्ते आणि पत्रकारांना मारहाण

पूरग्रस्त भागात राजकारण्यांकडून वारंवार संताप आणणाऱ्या घटना घडत आहेत. आज त्यात आणखी एका घटनेची भर पडली. सांगलीच्या नगरसेविका गीता सुतार यांच्या कार्यकर्त्यांनी मराठा सेवा संघाच्या वतीने पूरग्रस्तांसाठी चालवण्यात येणाऱ्या छावणीत घुसून कार्यकर्त्यांना मारहाण केलीय.
सांगलीमध्ये मराठा सेवा संघाने गेल्या ९ दिवसांपासून पूरग्रस्तांसाठी मदत केंद्र सुरु केलं आहे. याठिकाणी भाजप नगरसेविका गीता सुतार आणि त्यांचे कार्यकर्ते घुसले. केंद्रात नागरिकांना काही सुविधा मिळत नाहीत असा आरोप करत त्यांनी मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्या बचावासाठी आलेल्या पूरग्रस्तांनाही मारहाण करण्यात आली.
नगरसेविका सुतार यांनी याठिकाणी आश्रय घेत असलेल्या नागरिकांवरही केंद्रात सुविधा मिळत नाहीत असं सांगण्याचा दबाव टाकला, असा आरोप मराठा सेवा संघाने केलाय. या मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. गुंडांच्या मारहाणीत एका महिला पत्रकारालाही धक्काबुक्की झाली आहे.

Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997