Home News Update जनतेला विवेकानंदांचे विचार आत्मसात करण्याची गरज – भगत सिंह कोश्यारी

जनतेला विवेकानंदांचे विचार आत्मसात करण्याची गरज – भगत सिंह कोश्यारी

Courtesy: Social Media
Support MaxMaharashtra

विवेकानंद यूथ कनेक्ट फाउंडेशन तर्फे स्वामी विवेकानंद यांच्या १५७ व्या जयंती निमित्ताने “रन फॉर विवेकानंद झिरो प्लास्टिक मॅरेथॉन”चे जुहू चौपाटीवर आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी(Bhagat Singh Koshyari), अमृता फडणवीस, (Amruta Fadnavis) राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब, राजेश हिंदुजा आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

देशाला स्वामी विवेकानंदांच्या विचारांची नितांत गरज आहे. एक युवा कसा असला पाहीजे याचे उत्तम उदाहरण जगात स्वामी विवेकानंदांशिवाय दुसरे कोणाचे देता येणार नाही. देशाला सक्षम एक युवाच करु शकतो. म्हणून भारताच्या युवाला आणि जनतेला विवेकानंदांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे. असं मत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केलं.

भारत हा युवांचा देश आहे त्यामूळे भारतातला युवक हा स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी घडला पाहीजे असं मत या कार्यक्रम प्रसंगी परिवहन मंत्री अनिल परब यांनी व्यक्त केलं. त्याचप्रमाणे देशाला वेगवेगळ्या क्षेत्रात गौरणवित करणाऱ्या युवकांना राज्यपालांच्या हस्ते ‘स्वामी विवेकानंद यूथ फाउंडेशन’ तर्फे सन्मानित करण्यात आले.

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997