Home News Update बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सौरभ गांगुली?

बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सौरभ गांगुली?

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अध्यक्षपदी जवळजवळ निवड निश्चित समजली जात आहे. सौरव गांगुली यांचा अनुभव बीसीसीआयसाठी कामी येईल. या पदासाठी सौरव गांगुली यांना सर्वात जास्त पसंती मिळाली आहे.

सौरव गांगुली नंतर भारताची माजी क्रिकेटपटु ब्रिजेश पाटिल यांचा देखील या यादीत समावेश आहे. अमीत शहा यांचे चिरंजीव जय शहा यांची देखील BCCI च्या सचीव पदी तर अरुण धुमाळ यांची खजिनदारपदी निवड होऊ शकते.
अरुण हे केंद्रियमंत्री अनुराग ठाकुर यांचे बंधू आहेत. त्याचवेळी आसामच्या देबाजीत सैंकिया यांची संयुक्त सचीव पदी निवड होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या निवडणुकीसाठी सोमवारी नामांकन भरण्याची शेवटची मुदत असल्यामुळे आत्तापर्यंत केलेल्या उमेदवारांच्या विरोधात कोणीही अर्ज सादर केलेला नाही. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे.


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997