Home News Update पूरग्रस्तांना मदत करणाऱ्यांना जमावबंदी लागू नाही!

पूरग्रस्तांना मदत करणाऱ्यांना जमावबंदी लागू नाही!

235
0
स्वातंत्र्यदिनाच्या तसेच अन्य सणांच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून खरे तर दरवर्षीप्रमाणेच कोल्हापूर जिल्ह्यात आज जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. या आदेशाचा केवळ पूर्वार्धच सध्या माध्यमांतून फिरत असल्याने त्या संदर्भात गोंधळ, संभ्रम व संतापाचे वातावरण तयार होऊ लागले आहे. मात्र, प्रत्यक्षात याच अधिसूचनेमध्ये जमावबंदीचा हा आदेश शासकीय कामासाठी एकत्र येणारे अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्यदिनाचे कार्यक्रम, पूरग्रस्त भागातील मदतकार्य आणि त्या कार्यासाठी एकत्र जमणारे नागरिक त्याचप्रमाणे सर्व जातीधर्माचे सण, उत्सव, जयंती, यात्रा, इ. शांततामय मार्गाने साजरे करण्यासाठी जमणारा समुदाय, तसेच लग्न, इतर धार्मिक समारंभ, प्रेतयात्रा इत्यादींना लागू असणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
उलट, मदतकार्यात अडथळा होईल, अशा प्रकारच्या कोणत्याही आंदोलनासाठी हा आदेश लागू आहे, हे आपण लक्षात घ्यावे. मदतकार्यात असलेल्या आमच्या मित्र परिवाराने त्यांचे काम चालू ठेवावे. शासन त्यांच्याविरोधात नाही, तर त्यांच्या सुरक्षिततेसाठी दक्षतेचा उपाय म्हणून पोलीसांनी अधिक सतर्क राहावे, म्हणून असा आदेश दरवर्षी काढत असते. यंदा त्याला आपल्याकडे पूरस्थितीची तर राष्ट्रीय स्तरावर कलम ३७० ची किनार आहे, हे लक्षात घ्यावे. त्यामुळे आपण थोडे संयमाने घ्यावे, असे माझे साऱ्या मित्र परिवाराला नम्र आवाहन.

Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997