Home News Update काँग्रेसची संजय राऊत यांना समज

काँग्रेसची संजय राऊत यांना समज

Courtesy :Social Media
Support MaxMaharashtra

दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबद्दलचं वक्तव्य संजय राऊत यांनी मागे घेतल्यानं या वादावर पडदा पडलाय. पण संजय राऊत यांनी यापुढे अशी विधानं करु नये अशी समज काँग्रेसनं राऊतांना दिलीये. या वादावर प्रतिक्रिया देतांना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया देताना भविष्यात त्यांनी विचारपूर्वक विधानं करावीत. आमच्या महान राष्ट्रीय नेत्यांबद्दलचा तथ्यहीन अनादर काँग्रेस खपवून घेणार नाही. हे सर्वांनीच लक्षात ठेवावे, असं म्हटलंय.

दिवंगत इंदिरा गांधी या देशाच्या महान नेत्या होत्या. १९७५ सालामध्ये मुंबईतील व देशातील गुन्हेगारीचे कंबरडे मोडण्याचे काम त्यांनी केले. मुंबईतील स्मगलरांचे रॅकेट त्यांनी पूर्णपणे उद्ध्वस्त केले. ज्या करीम लालाबद्दल बोललं जातंय त्याच्यासकट हाजी मस्तान, युसुफ पटेलसारख्या अनेक गुन्हेगारी जगताशी संबंधित व्यक्तींना जेलमध्ये टाकून त्यांच्या मुसक्या आवळण्याचं काम इंदिरा गांधी यांनी केल्याचं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997