Home News Update ५ दिवसांचा आठवडा, मंत्री बच्चू कडू यांचा विरोध

५ दिवसांचा आठवडा, मंत्री बच्चू कडू यांचा विरोध

Support MaxMaharashtra

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याची मोठी घोषणा महाविकास आघाडी सरकारने केली आहे. पण आता या निर्णयावरुन सरकारमध्येत मतभेद असल्याचं उघड झाले आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यावर आक्षेप घेत पाच दिवसांचा आठवडा आणि सात दिवसांचा पगार अशी टीका केली आहे.

सरकारी कर्मचारी दोन दिवस तरी काम करतात का हे तपासून पाहिले पाहिजे, तसंच जो चांगला कर्मचारी आहे त्याचा पगार वाढवला पाहिजे, कामाचे मूल्यमापन करून कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना पगार दिला पाहिजे अशी मागणी केली आहे.

बच्चू कडू यांनी यापुर्वीही शासकीय कर्मचाऱ्यांसाठीच्या वेतन आयोगाला विरोध केला आहे. त्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करा अशी मागणी बच्चू कडू यांनी केली होती. मध्यंतरी आमदारांना दिलेल्या पगारवाढीला त्यांनी विरोध केलाय.

शासकीय कर्मचारी जनतेचं काम करत नाही अशी टिका बच्चू कडू कायम करत असतात. काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांशी त्यांचे नेहमीचं खटके उडाले आहेत. दोन अधिकाऱ्यांना मारहाण करण्याचे गुन्हे कडू यांच्यावर दाखल आहेत.

उध्दव ठाकरे सरकारमध्ये मंत्री झाल्यापासून बच्चू कडू यांनी आतापर्यंत चार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही बच्चू कडू यांनी मंत्री झाल्यावर दिला होता.

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997