Home मॅक्स रिपोर्ट वाट्टेल ते करा, पण राम मंदिर बांधा : उद्धव ठाकरे

वाट्टेल ते करा, पण राम मंदिर बांधा : उद्धव ठाकरे

Support MaxMaharashtra

अयोध्या दौऱ्यावर असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रामलल्लांचं दर्शन घेतल्यानंतर आज पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार निशाणा साधला. ‘माझी अयोध्यायात्रा यशस्वी झाली, देशातील लोकांच्या भावना सांगायला इथवर आलो होतो’. असं म्हणत राम मंदिर बांधता येत नसेल, तर तसे स्पष्ट सांगा कायदा करा, अध्यादेश काढा किंवा वाट्टेल ते करा, पण राम मंदिर बांधा असं म्हणत भाजपवर निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे?

 • रामाचं दर्शन घेताना वाटले, मी तुरुंगात आहे का? असं रामाला वाटेल, रामाचा वनवास संपला पाहिजे
 • अयोध्या यात्रेमागे कोणताही छुपा अजेंडा नाही
 • निवडणूक आल्यानंतरच काहीजण रामाचं नाव घेतात
 • बाळासाहेबांनी हिंदूंमध्ये पहिल्यांदा आत्मविश्वास निर्माण केला
 • राम मंदिर लवकरात लवकर बनवा, हिंदूंच्या भावनांशी खेळू नका
 • राम मंदिरासाठी अध्यादेश आणा आणि मंदिर बांधा
 • हिंदू मार खाणार नाही आणि गप्पही बसणार नाही
 • राम मंदिर हा चुनावी जुमला होता हे सांगा
 • राम मंदिर झालं नाही, तर सरकार बनणार नाही
 • प्रचाराच्या वेळी राम राम केला जातो आणि निवडणुकीनंतर आराम केला जातो
 • अच्छे दिन, 15 लाखांप्रमाणेच राम मंदिर हा जुमला होता, हे सांगा
 • राम मंदिर लवकरात लवकर बनवा, हिंदूंच्या भावनांशी खेळू नका
 • राम जन्म भूमिवर वेगळा अनुभव आला.
 • कायदा करा, अध्यादेश काढा किंवा वाट्टेल ते करा, पण राम मंदिर बांधा
 • उत्तर भारतीयांबाबत काय बोलले उद्धव ठाकरे?

मुंबईतील उत्तर भारतीयांमध्ये भीतीचं वातावरण नाही

 • काही उत्तर भारतीय अयोध्या दौऱ्यावर
 • माझ्यापेक्षा उत्तर भारतीय चांगलं मराठी बोलतात

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997