टीका केल्यानंतर अंजली दमानियांनी राज ठाकरेंना पाठवला ‘हा’ मेसेज

टीका केल्यानंतर अंजली दमानियांनी राज ठाकरेंना पाठवला ‘हा’ मेसेज

मी राज ठाकरे यांच्या विरुद्ध बोलले, म्हणून त्यांचा कार्यकर्त्यांनी मला खूप ट्रॉल केलं. चला एक बरं झालं, मला त्यांची खरी लेवल कळली. मला खूप फोन आले, काही कार्यकर्ते वाट्टेल ते बोलले. पण मी काय बोलावे ते मी ठरवणार, तुमचा पक्ष नाही व तुमचे राज ठाकरे नाही, असं उत्तर मी त्यांना दिले. मला जे वाटलं ते मी लिहिलं, ह्या सगळ्यांना घेऊन जायची गरज नव्हती असं मला वाटतं अँड I am entitled to have my views.
हेच राज ठाकरे, त्यांच्या प्रत्येक भाषणात जेव्हा सगळ्यांची टिंगल करतात, त्याबद्दल कधी कोणाला बोलावसं वाटलं नाही? का हिम्मत नाही?
आठवले ना अस्वल म्हणतात, ‘हा बिग बॉस मध्ये झोपायला जाणार का’? हे बोललं तर चालतं?
शरद पवार आज त्यांच्या सोबत आहेत, पण पूर्वी त्यांची टिंगल, तोंड वाकडं करून काढायचे या बद्दलही कधी कोणी बोललेलं मला आठवत नाही.
अजित पवार, फडणवीस या सगळ्यांचीच टिंगल राज ठाकरे नेहेमी उडवतात, मग मी बोलले तर का झोंबले? आणि माझा स्टेटमेंट नक्कीच सभ्य होतं.
भ्रष्टाचार या शब्दच एक पोलिटिकल टूल झाला आहे. CBI आणि ED चा वापर प्रत्येक सरकार सर्रास करतं यात दुमत अजिबात नाही आणि सरकार विरुध्द बोलण्याबद्दल मी त्यांचं नेहमीच समर्थन केलं. त्यांनी जे उत्कृष्ट भाषण केलं त्याचं मी पोस्ट लिहून कौतुकही केलं. हे सरकार सूड बुद्धीनेच काम करतय व फक्त विरोधी पक्षाच्या लोकांनाच घेरताना दिसतंय या दुमत बिलकुल नाही.
माझा आक्षेप या सगळ्यांच्या भ्रष्टाचारावर आहे. चिदंबरम आणि राज ठाकरे हे सगळे स्वच्छ आहेत का? ह्याचा भष्टाचार बाहेर यायला नको का? ह्यांच्या बरोबरच अमित शाह, येदूरप्पा, रेड्डी, शिवराज सिंग व इतर भाजपच्या सगळ्याच बड्या नेत्यांचा भ्रष्ट्राचार बाहेर आला पाहिजे, आणि त्यांना #शिक्षा झाली पाहिजे. ही टांगती तलवार ठेऊन गप्प करणं योग्य नाही. भाजप वॉशिंग मशीन मध्ये जे जातात त्यांचे सगळे तपास आपोआप थांबतात, हे सगळे थेर बंद झाले पाहिजे.
आज भाजप विदुद्ध माझी भूमिका ठाम आहे, पण आज शरद पवार, मुलायम सिंग, मायावती हे सुद्धा सरकार विरूद्ध बोलतात, मग या सगळ्यांच्या आपण उभं राहावं का? माझ्या बुद्धीला न पटण्यासारखे आहे. And I repeat
#I am entitled to my views