अखेर ठरलं 'खडसे'राष्ट्रवादी होणार

बरोबर एक वर्षापूर्वी विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या होत्या यामध्ये सर्व शक्तिशाली असलेल्या भाजपला आज पुन्हा एक धक्का बसला आहे.

Update: 2020-10-21 08:17 GMT

एकशे पाच आमदार निवडूनही सत्तेबाहेर असलेल्या भाजपला चाळीस वर्ष एकनिष्ठ असलेल्या माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सोडचिठ्ठी दिली आहे . ते आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शुक्रवारी दुपारी २ वाजता प्रवेश करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत दिली.आज एकनाथ खडसे यांनी फोन करून भाजप पक्षाचा राजीनामा दिल्याचे सांगितले आहे. त्यामुळे त्यांचे राष्ट्रवादीत आम्ही स्वागत करत आहोत असेही जयंत पाटील म्हणाले.

गेले कित्येक दिवस भाजपचे नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती ती चर्चा आज संपुष्टात आली असून आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केले.

Full View

आता फक्त त्यांनाच प्रवेश दिला जाणार असून त्यांचे समर्थक येण्यास इच्छूक आहेत त्यांनाही काही दिवसात प्रवेश दिला जाईल असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. गेले काही दिवस सातत्याने

खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा सुरू होती. एकनाथ खडसे यांना महाविकास आघाडी मध्ये कोणते मंत्रीपद मिळणार ते स्पष्ट झालेले नाही. यांचा राष्ट्रवादीत प्रवेश भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.बरोबर एक वर्षापूर्वी विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या होत्या यामध्ये सर्व शक्तिशाली असलेल्या भाजपला आज पुन्हा एक धक्का बसला आहे.

Similar News