Home मॅक्स ब्लॉग्ज अमेझॉनच्या भडकलेल्या आगीचा राजकीय संदेश

अमेझॉनच्या भडकलेल्या आगीचा राजकीय संदेश

पर्यावरणविरोधी निर्णय घेण्यास ‘प्रसिद्ध’ असलेल्या ब्राझिलच्या राष्ट्रपतींनी तिकडच्या ब्राझिल अवकाश संशोधन संस्थेच्या प्रमुखाला काही दिवसांपूर्वी हटवले, संबंधित संस्थेच्या प्रमुखाची चूक काय होती, तर अमेझॉनचं जंगल कमी होतेय, ही तक्रार खरी आहे, असा निर्वाळा देत पर्यावरणवाद्यांनी प्रसारित केलेले फोटो खरे असल्याचे प्रमाणपत्र त्यांनी दिले होते. अवकाशातूनही जंगल विरळ होतेय, हेच दिसते असे त्यांचे म्हणणे होते, जे तिकडच्या सत्तेला आवडले नाही. कारण सत्ता ऑक्सिजन देणाऱ्या जंगलाहून त्या जंगलाचा उपयोग आर्थिक प्रगतिसाठी करायच्या विचारात होती. आणि अवकाश संशोधन संस्थेचे प्रमुख पर्यावरणवादी विचारांचे. सत्ता क्रूर, मग्रुर असते. मात्र त्यामुळे निसर्ग, वास्तव कसे बदलेल?
courtesy social media
courtesy social media
सध्या अमेझॉनच्या जंगलातली आग भडकली आहे. ती काही करता आटोक्यात येत नाहीये. सुमारे १७०० किलोमीटरच्या परिसरावर काळ्या धुराचे साम्राज्य पसरले आहे. भर दिवसा तिकडे काळाकुट्ट अंधार दाटून आलाय. अवकाशातून धूर आणि आग स्पष्ट दिसतेय, इतके गडद आणि गहिरे संकट उभे आहे. तिकडच्या राष्ट्रपतींच्या पर्यावरणविरोधी धोरणांची चर्चा जगभर सुरु झालीय. अमेझॉनचे जंगल पृथ्वीला २०% ऑक्सिजन देते. जैववैविध्यासाठीही ते जगप्रसिद्ध आहे. तिकडे नवीन राष्ट्रपती आले तेव्हाच त्यांनी जंगलाचा वापर देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी करणार असल्याची महत्त्वाकांक्षी घोषणा केली होती!
courtesy social media
courtesy social media
फुटबॉलच्या मैदानांसाठी केवढे मोठे जंगल नष्ट केले होते, तेही आपण बघितलेच आहे. आणखी जंगल नष्ट करायचे तर आधी त्याला आग लावणे हा फंडा हमखास वापरला जातो…
भविष्यात मानवी समुदायाला याची जबर किंमत मोजायला लागणार आहे… मात्र राज्यकर्ते बेफिकीर असले की अशी मानवनिर्मित संकटे येणारच… आपल्या पृथ्वीचा अंतकाळ आम्ही आमच्या हातांनी जवळ आणतो आहोत.
courtesy social media
courtesy social media
BTW महापुरानंतर पंचगंगा नदीच्या पुररेषेत केलेल्या बदलांवरुन राज्यात सध्या चर्चा, वाद सुरु झालेले आहेत! पर्यावरण अभ्यासक सरकारला जबाबदार धरुन जाब विचारताय.
”निसर्गाशी असलेले नाते तुटताच माणुसकी संपुष्टात येते. मग तुम्ही स्वत:च्या नफ्यासाठी वनस्पती असो प्राणी, सरोवर असो व नदी सर्वांची सर्रास हत्या करीत सुटता. बिचारा निसर्ग त्याचे सौंदर्य आक्रसून घ्यायला लागतो.”
असे जे कृष्णमूर्ती यांनी सांगून ठेवले आहे, अशी आठवण पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांनी करुन दिलीय.

– भाऊ चासकर

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997