Home News Update कर्जमाफी बरोबरच शेतकऱ्यांना खर्च करण्यासाठी रोख रक्कम द्या!

कर्जमाफी बरोबरच शेतकऱ्यांना खर्च करण्यासाठी रोख रक्कम द्या!

194
0
Support MaxMaharashtra

परतीच्या पावसानं राज्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सततचा कोरडा दुष्काळ त्यानंतर आता पडलेला ओला दुष्काळ यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे.

त्यातच अनेक शेतकऱ्यांची सरकारच्या जाचक अटीमुळे कर्जमाफी देखील झालेली नाही. अजुनही शेतकरी कर्जमाफीच्या विळख्यात अडकलेला आहे. नावावर कर्ज असल्यानं बॅंका नवीन कर्ज देत नाहीत. आणि सरकार कागदपत्रं जमा करुन देखील कर्जमाफी करत नाही. अशी परिस्थ्ती सध्या शेतकऱ्यांची झाली आहे. त्यातच नावावर असणाऱ्या कर्जाचं ओझं व्याजामुळं वाढतच आहे.

डोक्यावर कर्ज असताना शेतकऱ्याने शेतात कसं तरी पीक उभा केलं आणि त्यातच आता कोरड्य़ा दुष्काळानंतर पडलेला ओला दुष्काळ. यामुळे शेतकरी पूर्ण हवालदिल झाला आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनी पूर्ण कर्जमाफीच नाही तर शेतकऱ्यांना उभं राहण्यासाठी काही रोख रक्कम देखील देण्याची मागणी सरकारकडं केली आहे.

पाहा मॅक्समहाराष्ट्राचे प्रतिनिधी रोहित वाळके यांनी अहमदनगर जिल्ह्यातील टाकळीमियॉ येथे शेतकऱ्यांशी केलेला संवाद…


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997