गेल्या 18 दिवसांपासून महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा सुरु असलेला तिढा अद्यापपर्यंत सुटलेला नाही. राज्यपालांनी भाजप (BJP) शिवसेना (shivsena) या पक्षानंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसला सत्ता स्थापनेचं आमंत्रण दिलं आहे. त्यातच कॉंग्रेसने (Congress) शिवसेनेला पाठींबा पत्र न दिल्यामुळं शिवसेनेची कोंडी झाली आहे.
दरम्यान आता राज्यात राज्यपालांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला सत्ता स्थापनेचं आमंत्रण दिलं आहे. त्यानंतर कॉंग्रेस काय भूमिका घेते याकडं सर्वांच लक्ष लागलं आहे. आज कॉंग्रेस राष्ट्रवादी पक्षाची राज्यात बैठक होत आहे या बैठकीत दोन्ही पक्ष ‘कॉमन मिनिमम प्रोग्राम’ वर चर्चा करणार आहेत. दोनही पक्षांची युती झाल्यास सत्तेची समीकरणं कशी असतील? राष्ट्रवादी काँग्रेससाठी सत्तेचं वाटप कसं असेल? यावरही चर्चा होणं अपेक्षित आहे. त्यामुळे या भेटीत राज्याची पुढची समीकरणं ठरवली जाणार आहेत.
हे ही वाचा :
दिल्लीची दादागिरी
परभणी : ‘आरोग्य सुविधा न देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार कापा !’
सामान्यांच्या आकलना पलिकडचं सत्तेचं राजकारण !!!
या संदर्भात माध्यमांशी बोलताना अजित पवार(Ajit pawar) यांनी या सर्व घडामोडी संदर्भात प्रतिक्रिया दिली. कॉंग्रेस चे नेते जयपूरला, कॉंग्रेसचं शिर्ष नेतृत्व दिल्ली आणि आम्ही मुंबईत त्यामुळं संवाद होऊ शकला नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
काल आम्ही दिवसभर कॉंग्रेस च्या पाठींब्याची वाट पाहिली. कॉंग्रेस च्या समर्थना शिवाय काहीच अर्थ नाही. स्थिर सरकार देण्यासाठी कॉंग्रेस सोबत असणं गरजेचं आहे. आमच्याकडून कुठल्याही प्रकारचा उशीर झाला नाही. आम्ही आता कॉंग्रेसशी बातचित करुन राज्यपालांना वेळ वाढवून देण्याची विनंती करणार आहोत. पाहा काय म्हणाले अजित पवार