Home max political  अजित पवारांच्या प्रचाराची धुरा सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर..

 अजित पवारांच्या प्रचाराची धुरा सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर..

बारामती आणि पवार कुटूंब असं समीकरण प्रत्येक निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळतं. यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत अजित पवार नेहमीप्रमाणे बारामतीतून राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. मात्र, अजित पवार यांना राज्यात विविध ठिकाणी सभा घ्याव्या लागत असल्याने स्वत:च्या मतदारसंघात थांबायला वेळ मिळत नाही.

त्यातच यंदाच्या निवडणूकीत धनगर समाजाचे मतदान जास्त असल्याने बारामतीतून धनगर समाजाच्या गोपिचंद पडळकर यांना उमेदवारी देऊन अजित पवार यांच्या समोर तगडं आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
अशा परिस्थित अजित पवार यांच्या प्रचाराची धुरा सांभाळण्याचं काम अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार करत आहेत.

सध्या सुनेत्रा पवार मतदारसंघ पिंजून काढत आहेत. यासंदर्भात मॅक्समहाराष्ट्रने त्यांच्यासोबत असलेल्या कार्य़कर्त्यांसह त्यांच्याशी प्रचारासंदर्भात बातचित केली… पाहा काय म्हणाल्या सुनेत्रा पवार

Support MaxMaharashtra

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997