नागपूर विद्यापीठाने अभ्यासक्रमात लागू केलेला RSS चा इतिहास रद्द करा…

नागपूर विद्यापीठाने अभ्यासक्रमात लागू केलेला RSS चा इतिहास रद्द करा…

भारतातील कोणत्याही शासकीय कार्यालयात नोंदणी नसलेल्या अनधिकृत संघटनेचा इतिहास व कार्य अभ्यासक्रमात सहभागी करणे ही कायदेशीर बाब नसून,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या अनधिकृत संघटनेचा बी.ए.च्या अभ्यासक्रमात समाविष्ट केलेला इतिहास रद्द करण्याची मागणी नोंदणीकृत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केली आहे.त्यामुळे अनधिकृत आणि अधिकृत असे दोन राष्ट्रीय स्वयं सेवक संघ आमने-सामने आल्याने एकच गोंधळ उडाला आहे.

नोंदणीकृत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष जनार्धन मुन यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या कुलगुरूंना केलेल्या तक्रारीत मुन यांनी विद्यापीठाने बीए च्या अभ्यासक्रमात समाविष्ट केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इतिहासाला अनधिकृत ठरवत हा अभ्यासक्रम तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे…भारताच्या कोणत्याही शासकीय कार्यालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अधिकृत नोंदनीं नसल्याने अशा अनधिकृत संघटनेचा इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ट करणे,गैर कायदेशीर असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे(नोंदणीकृत)राष्ट्रीय अध्यक्ष जनार्धन मुन यांनी म्हंटले असून,बेकायदेशीर रित्या अभ्यास क्रमात समाविष्ट करण्यात आलेला RSS चा इतिहास त्वरित रद्द केला नाही तर,न्यायालयात दाद मागण्याचा इशारा मुन यांनी दिला आहे.दरम्यान या एकूण बाबीत कुलगुरूंनाच जबाबदार धरण्यात येईल,असेही नोंदणीकृत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष जनार्धन मुन यांनी कुलगुरूंना दिलेल्या तक्रार वजा पत्रात नुमद केले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कुलगुरूंना लिहिले पत्र…