Home News Update पतीच्या मोबाईलमधले ‘ते’ व्हिडीओ पाहिले म्हणून पत्नीला पेटवलं

पतीच्या मोबाईलमधले ‘ते’ व्हिडीओ पाहिले म्हणून पत्नीला पेटवलं

Support MaxMaharashtra

महाराष्ट्रात दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. हिंगणघाट येथे तरुणीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळल्याची घटना घडल्यानंतर महाराष्ट्र अद्यापपर्यंत या धक्क्यातून सावरलेला नाही. तोच अहमदनगर जिल्ह्यामध्ये पतीने पत्नीला जीवंत जाळल्याची घटना समोर आली आहे.

पतीच्या मोबाईलमधले 'ते' व्हिडीओ पाहिले म्हणून पत्नीला पेटवलं

पतीच्या मोबाईलमधले 'ते' व्हिडीओ पाहिले म्हणून पत्नीला पेटवलं#MaxMaharashtra

Maxmaharashtra द्वारा इस दिन पोस्ट की गई गुरुवार, 13 फ़रवरी 2020

पत्नीने पतीच्या मोबाईलमध्ये आलेले व्हिडिओ पाहिल्याने पतीला राग आला आणि त्याने शिवीगाळ करत पेट्रोल टाकून पत्नीला पेटवून दिल्याची घटना घडली आहे. पत्नीने या संदर्भात सोनई पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून या तक्रारीत तिच्या पतीचे एका महिलेशी प्रेम संबंध होते.

या प्रेम संबंधाचे व्हिडिओ पाहिल्याच्या कारणावरून पती शंकर पाराजी दुर्गे याने तिला पेटवून दिले. तिचा पती शंकर दुर्गे, सासू चंद्रकला पाराजी दुर्गे आणि पतीचे प्रेमसंबंध असलेली महिला या तिघांनी संगनमत करून तिला शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. असं या महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात यांनी तक्रारी नंतर आरोपींच्या विरोधात जीवंत मारण्याचा गुन्हा दाखल केला आहे. सोनई पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान तीनही आरोपी पसार असून अद्यापपर्यंत कुणालाही अटक झालेली नसल्याचं पोलीसांनी म्हटलं आहे.

 

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997