Home News Update “आमदार फोडण्यापेक्षा, राज्याकडे लक्ष दिलं असतं तर ही वेळ आली नसती ”

“आमदार फोडण्यापेक्षा, राज्याकडे लक्ष दिलं असतं तर ही वेळ आली नसती ”

सांगली कोल्हापुर मधील पुरामुळे लोकांची अवस्था बिकट झाली असून सध्या सर्व स्तरातून मदतकार्य जोरदार रूपात चालू आहे. “नऊ दिवस पूरस्थिती असताना सहाव्या दिवसापासून NDRF व इतर शासकीय मदत लोकांपर्यंत पोहचली. त्यापूर्वी स्थानिक नागरिकच मदत पुरवत होते. महाजनादेश यात्रेतून वेळ काढून लोकांना मदत करायला पाहिजे होती. आमदार फोडण्याचे काम करण्यापेक्षा, राज्याकडे लक्ष दिलं असतं तर ही वेळ आली नसती” अशी टीका सांगली मध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्याना उद्देशून केली. सोबतच खाद्यपदार्थांच्या बॉक्सवर जाहिरातीचे स्टिकर्स लावण्यावरूनही काल सोशल मीडिया वर वादळ उठले होते. त्याविषयीही जयंत पाटील यांनी आपलं मत मांडले. पाहुयात जाहिरातीच्या स्टिकर्स वादावरून जयंत पाटील काय म्हणाले संबंधित व्हिडीओ मध्ये…

Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997