महाजनादेश पाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा

महाजनादेश पाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा

कोल्हापुर-सांगली इथली पुरपरिस्थीती आटोक्यात येत असताना आता राज्यात पुन्हा राजकीय पक्षांच्या यात्रा सुरु होत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा झाल्यानंतर लगेचच राष्ट्रवादीनेही आपल्या शिवस्वराज्य यात्रेची घोषणा केली आहे.
सांगली आणि कोल्हापूर इथं आलेल्या पुरामुळे स्थगित करण्यात आलेली राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा पुन्हा सुरु होत आहे. या यात्रेचा पुढचा टप्पा १९ ऑगस्टपासून सुरू होत आहे. या टप्प्यात यात्रा मराठवाड्यात जाणार असून सोमवारी म्हणजेच १९ तारखेला पैठण इथं संत एकनाथ महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन यात्रेला सुरुवात होणारंय. त्यानंतर बदनापूर, भोकरदन, पुसद, हिंगोली, परभणी, बीड, अंबोजोगाई, परळी, अशा मराठवाड्यातल्या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीचे नेते लोकांशी संवाद साधणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला उत्तर म्हणून राष्ट्रवादीने शिवस्वराज्य यात्रा काढली. पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली अनेक मतदारसंघात गेली. मात्र, कोल्हापूर आणि सांगली परिसरात आलेल्या पुरामुळे ही यात्रा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा ही यात्रा सुरु होणार आहे.
पुरपरिस्थितीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेवरून त्यांच्यावर टीका करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मात्र, शिवस्वराज्य यात्रेसाठी उत्साही असल्याचं पहायला मिळतंय.