Home पर्सनॅलिटी अभिनेत्री सुहिता थत्तेंची सावित्री उत्सवात सहभाग

अभिनेत्री सुहिता थत्तेंची सावित्री उत्सवात सहभाग

Support MaxMaharashtra

मॅक्स महाराष्ट्र महिलांमध्ये शिक्षणाची ज्योत पेटवून महिलांना शिक्षणाचं दार उघडं करुण देणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस ‘सावित्री उत्सव’ म्हणून साजरा करत आहे. या मोहिमेत अनेक सावित्रीच्या लेकींनी सहभाग घेतला आहे. अभिनेत्री सुहिता थत्ते यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट लिहून या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

सावित्री उत्सव

३ जानेवारी २०१९

मी सुहिता थत्ते,
अभिनेत्री….
मी Orthotic and Prosthetic Engineering शिकले. माझी मुलगी Msc Life Science Biotech शिकली.माझी आई BA.. BEd होती. आजी आणि पणजी ही शिकल्या होत्या. आम्ही आमच्या आवडीचे शिक्षण घेऊ शकलो. आज निर्भयपणे आवडीचे काम करू शकतो. याचं कारण १७० वर्षापूर्वी सावित्री बाई फुले आणि तिचे पती ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा वसा घेतला.
मला सावित्रीबाई यांच्या बद्दल वाटणारी कृतज्ञता मी व्यक्त करणार आहे.३ जानेवारीला कपाळावर सावित्रीबाई सारखी चिरी रेखून, दारात रांगोळी काढून, उंबऱ्यावर पणती तेवत ठेवून …….
तुम्हाला ही सावित्रीबाई बद्दल कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर तुम्ही ही असं करू शकता….करणार ना ?

सुहिता थत्ते
अभिनेत्री

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997