Home News Update MaxMaharashtra Hack : दोषींवर कारवाई झालीच पाहिजे – रविकांत तुपकर

MaxMaharashtra Hack : दोषींवर कारवाई झालीच पाहिजे – रविकांत तुपकर

Support MaxMaharashtra

मॅक्समहाराष्ट्रचं यूट्युब अकाऊंट हॅक आणि डिलीट करण्यात आलंय. या संदर्भात राज्यातील मॅक्समहाराष्ट्रा च्या वाचकांसह राजकीय प्रतिनिधींनी हे अकाउंट हॅक झाल्य़ाबाबत संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी देखील ट्विट वर प्रतिक्रिया दिली आहे. आजच्या माध्यम क्षेत्रामध्ये एक निर्भीडपणे सर्वसामान्य व समाजातील प्रत्येक घटकांसाठी लढणारी पत्रकारिता आम्ही मॅक्समहाराष्ट्र च्या माध्यमातून बघतो असे MaxMaharashtra चे Youtube चॅनल हॅक करण्यात आले. त्याचा मी निषेध करतो व यामधील दोषींवर कारवाई झालीच पाहिजे…

दिनांक 9 नोव्हेंबर 2019 ला 8 वाजता हे अकाउंट हॅक करण्यात आलं. तर MaxMaharashtra चे हिंदी व्हिडीओ अपलोढ करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या MaxMaharashtra Hindi या अकाउंटवर Porn Video अपलोढ करण्यात आले आहेत. त्यामुळं या चॅनेल ला देखील यूट्युबने कॉपी राईट पाठवला आहे. त्यामुळं आता हे चॅनेल देखील यूट्यब कडून बंद केलं जाण्याची शक्यता आहे.

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997