कुलगुरूंसह इतरांविरोधात एट्राँसिटी ऍक्ट नुसार चतु:शृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

कुलगुरूंसह इतरांविरोधात एट्राँसिटी ऍक्ट नुसार चतु:शृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ समजला जातो. मात्र पत्रकारांवरच खोटे गुन्हे दाखल होणे ही गंभीर बाब आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आकाश भोसले मराठी विभागामध्ये एम फील चे शिक्षण घेत आहेत. तसेच आवाज टुडे चॅनेलला संपादक म्हणून काम करीत असताना मॅक्समहाराष्ट्र वेब पोर्टल आणि दैनिकांसाठी फ्री लान्स बातम्या सुद्धा देत असतात.

२८ मार्च २०१९ रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने रिफेक्टरीच्या(खानावळ) संदर्भात एक परिपत्रक काढले होते. जे परिपत्रक विद्यार्थ्यांच्या हिताचे नव्हते. याबाबत विद्यार्थी आक्रमक झाल्याचेही पत्रकार आकाश भोसले यांनी ३१ मार्च च्या अंकात बातमी प्रसिद्ध करून सांगितले होते. याअगोदर आकाश भोसले यांनी विद्यापीठाच्या चुकीच्या धोरणांबाबत तसेच बोगस भरती आणि भ्रष्टाचाराबाबत अनेक बातम्या प्रसिद्ध केलेल्या आहेत. त्यामध्ये सिनेट सदस्य कसा जातीयद्वेष करतात याचाही उल्लेख आहे.

संबंधित परिपत्रकावरून १ एप्रिल २०१९ रोजी विद्यापीठातील रिफेक्टरीसमोर १५०-२०० विद्यार्थ्यांचा रि-फेक्टरीत जेवण करण्याच्या प्रवेशावरून गोंधळ निर्माण झाला. याठिकाणी विद्यापीठाचे सेक्युरिटी तसेच चतु:शृंगी पोलीस स्टेशनचे पोलीसही उपस्थित राहून सदर गोंधळ पाहात होते.या संपूर्ण प्रकरणाचे लाईव्ह कव्हरेज मॅक्स महाराष्ट्र चॅनेल साठी आकाश भोसले करीत होते.त्याचे फुटेज सुद्धा उपलब्ध आहेत.

या प्रकरणानंतर आकाश भोसले यांच्यासह इतर ११ विद्यार्थ्यांवर ३५३ सारखे इतर गंभीर गुन्हे दाखल झाले होते. पत्रकार म्हणून रिपोर्टिंग करण्यासाठी सदर ठिकाणी उपस्थित असताना हे गुन्हे दाखल झालेच कसे ? हे प्रश्न अनुत्तरीतच आहेत.मात्र, विद्यापीठाच्या विरोधात पुराव्यासह दिलेल्या बातम्यांमुळेच षडयंत्र रचून आपण अनुसूचित जाती जमातीमधून येत असल्याने हे गंभीर गुन्हे दाखल झाले असल्याचे पत्रकार आकाश भोसले यांनी चतु:शृंगी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

मात्र, या तक्रारीवरून पोलीस स्टेशनने आकाश भोसले यांना समजपत्र देऊन अँट्राँसिटी चा गुन्हा दाखल करून घेता येणार नसल्याचे समजपत्र दिले होते. त्यानंतर अ‍ॅड. तोसिफ शेख आणि स्वप्नील गिरमे यांच्यामार्फत पुणे जिल्हा सत्र न्यायालयात भोसले यांनी न्यायासाठी धाव घेतली  होती.न्यायालयाने सर्व प्रकरण ऐकून घेतल्यानंतर ले पुणे विद्यारू नितीन करमळकर, कुलसचिव प्रफुल्ल पवार, सिनेट सदस्य संजय चाकणे, सुरक्षा संचालक सुरेश भोसले, सुरक्षारक्षक भुरसिंह अजितसिंह राजपूत, यांच्यावर अँट्राँसिटी कायद्यासावित्रीबाई फुपीठाचे कुलगुन्वये गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ६/०७/२०१९ रोजी चतु:शृंगी पोलीस स्टेशनमध्ये पुणे विद्यापीठाचे कुलगुरू आणि इतरांविरोधात अँट्राँसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस आयुक्त शिवाजी पवार करीत आहेत.