Home News Update मोदींची शिवाजी महाराजांशी तुलना, उदयनराजे गप्प का?

मोदींची शिवाजी महाराजांशी तुलना, उदयनराजे गप्प का?

71
0
Support MaxMaharashtra

छत्रपती शिवाजी महाराजांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणारं पुस्तक भाजपनं प्रकाशित केल्यानं राज्यातलं वातावरण चांगलंच तापलंय. छत्रपतींचे वंशज संभाजीराजे यांनी आपली नाराजी थेट जाहीर केलीये, पण छत्रपतींचे आणखी एक वंशज उदयनराजे भोसले यांनी मात्र या वादावर अजूनही मौन बाळगलंय. छत्रपती शिवाजी महाराजांशी नरेंद्र मोदींची तुलना केल्यानं छत्रपती संभाजीराजे, शिवेंद्रराजे भोसले यांनी आपली नाराजी व्यक्त करत भाजप नेत्यांना खडेबोल सुनावलेत. पण उदयनराजे यांच्याकडून अजूनही कोणतीही प्रतिक्रिया न आल्यानं राजकीय चर्चेला सुरूवात झालीये.

संजय राऊत यांनी तर आता शिवाजी महाराजांचे वंशज गप्प का असा थेट सवालच विचारलाय. तर दुसरीकडे आता शिवाजी महाराजांचे वंशज भाजप सोडणार का, असा सवालही विचारला जाऊ लागलाय. विधानसभा निवडणुकीआधी खासदारकी सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या उदयनराजे यांचा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत पराभव झाला होता.

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997