Home max political मुख्यमंत्र्यांचा संजय कोण?

मुख्यमंत्र्यांचा संजय कोण?

Support MaxMaharashtra

सोशल मीडियावर एक मेसेज सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.खिडकी उघडली की पाऊस आणि बातम्या लावल्या की राऊत दोघांनीही नुसता धुमाकूळ घातला आहे…

सोशल मीडियावरील ही प्रतिक्रिया संजय राऊत यांनी गेल्या 10 ते 12 दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्या वतीनं जी माध्यमांवर बॅटींग केली. त्यासाठी खूप बोलकी आहे. मात्र, राऊत यांनी ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांची बाजू मांडली, त्या पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बाजू मांडायला कोणीही पुढं येताना दिसलं नाही. असं काहीसं चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

मात्र, खरंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकटे पडल आहेत का? इतर राज्यात सत्ता स्थापनेसाठी जाणारे अमित शाह महाराष्ट्रात का आले नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील राजकारणात लक्ष का घातले नाही? तावडे, खडसे, पंकजा मुंडे यांनी सत्ता स्थापनेत मुख्यमंत्र्यांची बाजू का मांडली नाही? त्याच बरोबर मुख्यमंत्र्यांवर राज्यातील गडकरी गट नाराज आहे का? या सह मुख्यमंत्र्यांचं पाच वर्षाचं राजकारण नक्की कसं होत? राज्यात भाजपचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून संघाची भूमिका नक्की काय होती?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक काळात केलेली वक्तव्यं आज त्यांच्या अंगलट आली आहेत का? सत्ता स्थापनेच्या या सर्व घटनांमध्ये मुख्यमंत्री एकाकी पडले आहेत का? मुख्यमंत्र्यांची साथ देण्यासाठी येणारे नेते शिवसेनेच्या संजय राऊत यांच्या प्रमाणे बाजू मांडू शकत नाही का? पाहा मुख्यमंत्र्यांचा संजय कोण?


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997