Home News Update नागपुरात अल्पवयीन मुलीची दगडाने ठेचून हत्या; नागरिकांची ‘हैद्राबाद पॅटर्न’ची मागणी

नागपुरात अल्पवयीन मुलीची दगडाने ठेचून हत्या; नागरिकांची ‘हैद्राबाद पॅटर्न’ची मागणी

Support MaxMaharashtra

नागपुर जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीची दगडाने ठेचून हत्या केल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला आहे. या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचारही झाला असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. घटनेनंतर कळमेश्वर तालुक्यात नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी घटनेतील संशयितास अटक केली असुन विशेष म्हणजे हैद्राबादमधील  आरोपींप्रमाणे (Hydrabad Rape Case Encounter) येथेही आरोपीस शिक्षा मिळावी अशी संतप्त नागरिकांची मागणी आहे.

नागपुर पासून ३५ किलोमीटर दूर कळमेश्वर तालुक्यातील लिंगा या गावातून गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेली नीलम शांताराम भलावी (वय 5) हिचा मृतदेह आज (८ डिसेंबर) गावाजवळील शेतात सापडला. तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली असल्याचे दिसून आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.

मुळचे मध्यप्रदेशातील असलेलं शांताराम भलावी यांचं कुटुंब गेल्या पाच वर्षापासून लिंगा या गावात मोलमजुरी करत वास्तव्यास आहे. त्यांची मुलगी नीलम गावातील जी.प.शाळेत बालवाडीच्या वर्गात शिकत होती. ६ डिसेंबर रोजी ती गावात राहणाऱ्या तिच्या आजीकडे जातो म्हणून घरून निघाली मात्र ती परत घरी आली नाही. मुलगी घरी परतली नाही म्हणून तिचा शोध घेतला पण ती सापडली नाही.

कळमेश्वर पोलिस स्टेशन येथे प्राथमिक तक्रार नोंदवण्यात आली. पोलिसांनी लगेच त्या मुलीचा गावालगतच शोध घेण्याचा प्रयत्न केला. आज सकाळी स्थानिक पोलिस आणि गावकरी तिचा शोध घेत असताना ती गावालगत असलेल्या संजय भारती यांच्या शेतात अस्ताव्यस्त अवस्थेत दिसली. तिच्या तोंडात बोळा होता. ही घटना कळताच कळमेश्वर पोलीस पोहोचले आणि मृतदेहाची तपासणी केली असता तिच्या डोक्यावर दगड मारून हत्या करण्यात आल्याचं निष्पन्न झालं.

पोलिसांनी तपास चक्रं फिरवत शेतात काम करणाऱ्या सालदारावर संशय व्यक्त होत असल्याने त्याला ताब्यात घेतले. संजय देवराव पूरी (वय ३२) असे आरोपीचे नाव आहे. मुलीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आला आहे.

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997