Home News Update ‘कलम 370 आणि भविष्य’ या विषयावर अमरावतीत चर्चा; ज्येष्ठ पत्रकार आशुतोष यांचे...

‘कलम 370 आणि भविष्य’ या विषयावर अमरावतीत चर्चा; ज्येष्ठ पत्रकार आशुतोष यांचे मार्गदर्शन

“जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे आर्टिकल 370 रद्द करणे याचे मी वैयक्तिक पातळीवर स्वागत करतो. मात्र, हा निर्णय घेताना जम्मू-काश्मीरच्या नागरिकांना विश्वासात घेणे अतिशय आवश्यक होते. काश्मीरमध्ये कर्फ्यू हा काही नवीन नाही. सध्याही कर्फ्यू आहे. महाराष्ट्राबाबत एखादा निर्णय घेण्यात आला आणि याची माहिती महाराष्ट्राच्या लोकांना दिली नाही, तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात याचा विचार करा. असेच काहीसे जम्मू-काश्मीरमध्ये झाले आहे. त्यामुळे त्याचे परिणाम भयावह होऊ शकतात”, अशी भीती ज्येष्ठ पत्रकार आशुतोष यांनी व्यक्त केली आहे.
भारती महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाच्या वतीने ‘कलम 370 आणि भविष्य’ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी भारतीय विद्या मंदिराचे अध्यक्ष आर. बिडवे यांच्या अध्यक्षतेत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ‘आर्टिकल 370 वास्तव आणि भवितव्य’ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार आशुतोष यांनी महत्त्वाची माहिती दिली.
“काश्मीरमध्ये जी काही समस्या निर्माण झाली आहे. यामागे अनेक कारणे आहेत. यासाठी कोणी एक व्यक्ती अजिबात जबाबदार नाही. अनेकजण म्हणतात काश्मीरची समस्या ही नेहरूंमुळे निर्माण झाली, खरे तर काश्मीरची डोकेदुखी नेहमीपेक्षा अनुभवी असणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांना भारतासोबत नको होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जम्मू आणि लडाख भारताशी जोडावे आणि काश्मीर पाकिस्तानला देऊन टाकावा, असे नमूद केले आहे. आर्टिकल 370 नुसार जम्मू-काश्मीर भारताशी जोडला गेला” असे आशुतोष म्हणाले.

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997