Home Election 2019 २०१४ चा निर्णय ऐतिहासिक चूक होती – जितेंद्र आव्हाड

२०१४ चा निर्णय ऐतिहासिक चूक होती – जितेंद्र आव्हाड

Support MaxMaharashtra

सध्या महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा पेच प्रसंग समोर आला आहे. अशा प्रकारचा पेच प्रसंग 2014 ला देखील उपस्थित झाला होता. मात्र, त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपलं वजन भाजपच्या पारड्यात टाकून भाजपला विधानसभेत विश्वासमत ठराव पास करण्यात मदत केली होती.

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या. मात्र, हा आकडा भाजप राज्यात सत्ता स्थापन करण्याइतपत म्हणजे 144+ इतका नाही. त्यामुळे स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचं स्वप्न भाजपचं भंग पावलं आहे. आणि पुन्हा एकदा भाजपला सत्ता स्थापनेसाठी टेकूची गरज आहे. त्यातच शिवसेना आणि भाजप हे दोनही पक्ष सोबत लढूनही एकत्रीत सत्ता स्थापनेसाठी तयार नाहीत.

सध्या घडणाऱ्या राजकीय घडामोडी संदर्भात मॅक्समहाराष्ट्र चे संपादक रविंद्र आंबेकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याशी बातचित केली. यावेळी राष्ट्रवादीने 2014 ला भाजपला मदत केली. 2019 ला राष्ट्रवादी शिवसेनेला मदत करत आहे का? असा सवाल केला असता आव्हाड यांनी ती आमची ऐतिहासीत चूक असल्याचं म्हटलं आहे… पाहुयात काय म्हणाले आव्हाड

 

 

 

 


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997