विधानसभा निवडणुकीसाठी कम्युनिस्ट पक्षाचे १६ उमेदवार रिंगणात

विधानसभा निवडणुकीसाठी कम्युनिस्ट पक्षाचे १६ उमेदवार रिंगणात

भारतीय कम्यूनिस्ट पक्षातर्फे विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील १६ उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. पक्षाच्या राज्य कार्यकारणीतर्फे प्रकाश रेड्डी यांनी ही यादी जाहीर केली.

राज्यातल्या फॅसिस्ट शक्ती असलेल्या शिवसेना-भाजप युतीला सत्तेतून खाली खेचून पुरोगामी विचारांची लोक सत्तेत आली पाहिजेत म्हणून कम्यूनिस्ट पक्ष निवडणूक लढवत असल्याचं रेड्डी यांनी सांगितलं.

त्यासोबत राज्यात ज्याठिकाणी पक्षाने उमेदवार दिलेले नाहीत तिथे पुरोगामी आणि लोकशाहीवादी उमेदवारांना कम्युनिस्ट पक्षाचा पाठींबा असेल असंही रेड्डी यांनी जाहीर केलं आहे.

कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार

सायन कोळीवाडा – कॉ. विजय दळवी

विक्रमगड – कॉ. सुरेश भोईर

भिवंडी ग्रामीण – कॉ. नितेश म्हसे

कर्जत – कॉ. गोपाळ शेळके

वाई – कॉ. धनराज कांबळे

कोल्हापूर उत्तर – कॉ. सतिश कांबळे

चांदवड-देवळा – कॉ. दत्तात्रय गांगुर्डे

शिरपूर – कॉ. विकास सैंदाणे

अहमदनगर शहर – कॉ. बहिरनाथ वाकळे

गेवराई – कॉ. भाऊराव प्रभाळे

औरंगाबाद मध्य – कॉ. अभय टाकसाळ

जिंतूर – कॉ. अंकुश राठोड

वाशिम – कॉ. भारत नांदुरे

वणी – कॉ. अनिल घाटे

ब्रम्हपूरी – कॉ. विनोद झोडगे

आरमोरी – कॉ. दिलीप परचाके