विधानसभेत मनसेला आघाडीत प्रवेश मिळणार का? काय म्हणाले शरद पवार

50Shares
लोकसभा निवडणूकीत भाजपवर हल्ला करत कॉंग्रेस राष्ट्रवादीला फायदा होईल अशी भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंसंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मनसेसोबत आगामी विधानसभा निवडणूकीत आघाडी करण्याबाबत भाष्य केलं आहेत. शरद पवार यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आगामी निवडणूकांमध्ये मनसेला आघाडीत घेण्याचे संकेत दिले आहेत.
काय म्हणाले शरद पवार?
 ‘या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचा एककलमी कार्यक्रम आहे. मोदी-शहा जोडी देशाला घातक आहे, हे त्यांना सांगायचं आहे. त्यांनी ही निवडणूक लढवली नाही. मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांचे उमेदवार असतील. चुकीच्या लोकांच्या हातून राज्य काढून घेण्यासाठी उद्याच्या काळात चर्चा होऊ शकते,’ असं म्हणत शरद पवार यांनी मनसेबाबत आपली भूमिका जाहीर केली आहे.
यावेळी शरद पवार यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला बोफोर्सवेळी Joint parliamentary committee (जेपीसी) ची मागणी केली ती मान्य केली पण राफेलप्रकरणी ही मागणी का मान्य होत नाही? असा सवाल करत शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींवर थेट निशाणा साधला.