‘हे’ प्रश्न तुम्ही मोदींना का विचारत नाही – राहुल गांधी

‘हे’ प्रश्न तुम्ही मोदींना का विचारत नाही – राहुल गांधी

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषदेला हजेरी लावली. मात्र, पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तर टाळली. तर दुसरीकडे राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर हल्ला बोल करत गेल्या ५ वर्षाच्या मोदी सरकारच्या कारभारावर टीका केली. यावेळी राहुल यांनी मोदींना विचारल्या जाणारे प्रश्न आणि त्यांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांवर भेद का? असा प्रश्न पत्रकारांसमोर उपस्थित केला.

“आंबा कसा खातो, कुर्ता कसा घालतो या प्रश्नांची उत्तरं मोदी देतात. पण महत्त्वाच्या प्रश्नांवर बोलत नाहीत. आत्ता मला कुणीतरी सांगितलं की, मोदींच्या पत्रकार परिषदेपूर्वी तिथले दरवाजे म्हणे बंद करून घेतले आहेत, नाहीतर इथून काही पत्रकारांना तिथे पाठवलं असतं”, असंही राहुल म्हणाले.