Elections 2019: मोदींनी का टाळली पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तर?

गेल्या ५ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच पत्रकार परिषदेत Press Conference हजर राहिले. मात्र, एकाही प्रश्नाचं उत्तर न देता मोदी फक्त भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या शेजारी बसलेले होते. काही पत्रकारांनी मोदींना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, अमित शाह यांनीच उत्तर दिली. विशेष म्हणजे मोदींनी पत्रकारांच्या प्रश्नापुर्वी आपल्या देशाची लोकशाही परंपरा कशी महान आहे. याचे गुणगाण केले. मात्र, याच लोकशाहीतील चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तर टाळली. या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी १६ प्रश्न विचारले होते.