दोन वेळा मतदान करा – मंदा म्हात्रे, आमदार भाजप

178Shares
देशात सध्या निवडणूकीचे वारे जोरदार वाहत आहेत त्यातच नेते मतदारांना अजब सल्ले द्यायला लागले आहेत. युतीचे ठाण्यातील उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी कोपरखैरणे येथे मेळाव्याचे आयोजन कऱण्यात आले होते. या परिसरात सातारा आणि शिरुर मतदारसंघातील नागरिक मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. या वेळी आयोजित सभेत बोलताना भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांनी सातारा मतदारसंघात २३ एप्रिल रोजी मतदान झाल्यानंतर पुन्हा २९ तारखेला नवी मुंबईत मतदान करण्याचा अजब सल्ला मतदारांना दिला आहे.
ठाण्यातील कोपरखैरणे परिसरात सातारा आणि शिरुर मतदारसंघातील नागरिक मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. ते पाहता युतीच्या या मतदारसंघातील उमेदवारांसाठीही हा मेळावा होता. मात्र बोलताना आपली चुक झाली आहे हे लक्षात येताच राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील असाच सल्ला यापूर्वी दिला होता असं सांगत सारवासारव केली.
दरम्यान राष्ट्रवादी काॅंग्रेसने मंदा म्हात्रे यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेवून निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या तक्रारीवर निवडणूक आयोगाने आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे.