Video : पंतप्रधानपदासाठी प्रकाश आंबेडकरांचा कोणत्या पक्षाला पाठींबा?

152
0
सोलापूर : प्रकाश आंबेडकरांनी मोठी घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालात कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही. असे अंदाज वर्तवले जात असताना प्रादेशिक पक्षांचे महत्व वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं प्रादेशिक पक्ष तसंच नव्यानं स्थापन झालेल्या आघाड्या यांचं महत्त्व वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता हे पक्ष ज्या पक्षाला पाठींबा देणार त्या पक्षाचा पंतप्रधान होण्याची शक्यता आहे.
या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना विचारले असता, त्यांनी ‘पंतप्रधानपदासाठी राहुल गांधींपेक्षा मायावतींना पाठिंबा देवू. मात्र, शरद पवारांना पाठिंबा देणार नाही’. असं म्हणत मायावतीला पाठींबा दिला आहे.
लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी लोकसभेत जास्त जागांवर निवडून येणार असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. पाहा काय म्हणाले प्रकाश आंबेडकर…