उदयन भोसलेंच्या त्या वक्तव्याचा विपर्यास केला – पंकजा मुंडे

उदयन भोसलेंच्या त्या वक्तव्याचा विपर्यास केला - पंकजा मुंडे
536Shares
साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयन भोसले यांनी नुकतंच एक वादग्रस्त वक्तव्यं केलं होतं. प्रचारादरम्यान महाविद्यालयीनं युवकांशी संवाद साधतांना एका तरूणींनं तरूणांकडून होणाऱ्या छेडछाडीबद्दल उदयन भोसले यांना प्रश्न विचारला. त्यावर मुलांनी मुलीकडे नाही तर कुणाकडे पाहायचं असं सांगत, त्या विकृती नसली पाहिजे, असं मत व्यक्त केलं होतं. त्याबाबत महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांना पत्रकारांना विचारणा केली. त्यावर मी यासंदर्भातलं त्यांचं वक्तव्यं मोबाईलवर ऐकलं. त्यामुळं त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला असल्याचं मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं.