लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील ९१ जागांसाठी आज मतदान  

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील ९१ जागांसाठी आज मतदान  
17Shares
सतराव्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान होणार आहे. देशातील १८ राज्ये आणि दोन केंद्र शासित प्रदेशांतील ९१ मतदारसंघांत मतदान होणार आहे. त्यात महाराष्ट्रातील विदर्भातल्या १० पैकी ७ मतदारसंघात मतदान होणार आहे. गडचिरोली जिल्ह्य़ातील ५०० हून अधिक अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.
नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशीम आणि वर्धा मतदारसंघात गुरुवारी सकाळी ७ पासून मतदानाला सुरूवात होईल. एकूण ११६ उमेदवार रिंगणात आहेत. १ कोटी ३० लाख मतदार आहेत. त्याच्यासाठी एकूण १५ हजारपेक्षा अधिक मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान शांततेत पार पडावे म्हणून एकूण ११ हजारांवर सुरक्षादल तैनात करण्यात आले आहे.