‘ही’ जागा पंतप्रधानांच्या पत्रकार परिषदेसाठी राखीव आहे

‘ही’ जागा पंतप्रधानांच्या पत्रकार परिषदेसाठी राखीव आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पत्रकार परिषद खऱ्या अर्थाने ऐतिहासिकच ठरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकार परिषदेला उपस्थित तर राहिले. मात्र, या पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांच्या एकाही प्रश्नाला उत्तर दिले नाही.
Courtesy : Telegraphindia
’The Telegraph’ (‘द टेलिग्राफ’) या इंग्रजी दैनिकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्रकार परिषदेची बातमी देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. पहिल्या मथळ्यात ‘No Sound’ हे चिन्ह दिलं असून त्या खाली पत्रकार परिषदेत पत्रकारांचे प्रश्न सुरु झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो देण्यात आले असून ही पत्रकार परिषद सुरु असताना मोदींच्या चेहऱ्यावरील भाव मुद्रा देण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकारांचे प्रश्न सुरु झाल्यानंतरचे फोटो देण्यात आले आहेत.

या फोटोखाली मोकळी जागा सोडण्यात आली असून या जागेवर एक सूचना दिली आहे.

‘द टेलिग्राफ’ ही जागा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्रकार परिषदेसाठी राखीव ठेवत आहे. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तर देतील. तेव्हा ही जागा भरलेली असेल. ( ’The Telegraph is reserving this space, which will be filled when the Prime Minister answers questions at a press conference Watch this Space)

Courtesy : Telegraphindia
असं म्हणत पत्रकार परिषदेला उपस्थित असुनही पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं टाळणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.