पालघरमध्ये मत्स्यविद्यापीठ करा – आमदार मनिषा चौधरी

मुंबई आणि परिसरातील मत्स्यव्यवसायाची गरज लक्षात घेऊन पालघरमध्ये मत्स्यविद्यापीठ स्थापन करावं, अशी मागणी आमदार मनिषा चौधरी यांनी केलीय. त्याचप्रमाणे समुद्रकिनाऱ्या शेजारी राहणाऱ्या मच्छिमार, कोळी, माळी, भांडारी या समाजातील लोकांच्या जमिनी अजूनही त्यांच्या नावावर झालेल्या नाहीत. त्यामुळं या जमिनींचा ७/१२ त्यांच्या नावानं केला पाहिजे, अशी मागणीही आमदार चौधरी यांनी केलीय. त्याचप्रमाणे म.फुले आरोग्य जीवनदायी योजनेच्या निकषातही बदल करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं.