पाणावलेल्या डोळ्यांनीच रक्षा खडसेंची प्रचाराला सुरूवात

246Shares
भाजपच्या रावेर लोकसभेच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी आज सकाळी मुक्ताईनगर येथे ग्रामदैवत संत मुक्ताईंचे दर्शन घेऊन आपल्या प्रचाराचा नारळ फोडला. माजीमंत्री एकनाथ खडसे हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित नसल्याने रक्षा खडसेंना गहिवरून आलं.
माजीमंत्री एकनाथ खडसे हे कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. मात्र, त्यांनी भ्रमणध्वनीवरून उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधत कार्यकर्त्यांना रक्षा खडसे यांच्या पाठीशी उभे राहण्याचे भावनिक आवाहन केले. कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना रक्षा खडसेंनी, 2014 च्या निवडणुकीवेळी जी दुर्दैवी परिस्थिती होती तशीच परिस्थिती आजही माझ्यासमोर आहे. तेव्हा पती निखिल खडसेंचे निधन झालं होतं तर आता माझे मार्गदर्शक एकनाथ खडसे हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपल्यात उपस्थित नाहीत. परंतु कार्यकर्त्यांच्या पाठबळाच्या जोरावर मी आज तुमच्यासमोर उभी आहे, असा भावनिक संवाद साधला.
एकनाथ खडसे उपचारासाठी गेल्या आठ दिवसापासून मुंबईत उपचार घेत आहेत खडसेंची अनुपस्थित यावेळी मात्र, प्रकर्षाने भाजप मध्ये जाणवत होती.