भाजपला शह देण्यासाठी ‘राज ठाकरे आणि आंबेडकरांनी एकत्र यावे – राजू शेट्टी

राज ठाकरे यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधींची भेट घेतली. या भेटीमुळे अनेक राजकीय चर्चां सुरु झाल्या. आगामी विधानसभा काही महिन्यांवर असताना या भेटीमुळे महाराष्ट्रातील राजकीय गणितं बदलू शकतात. दरम्यान याआधी राज ठाकरेंची भेट स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी घेतली होती. राजू शेट्टी यांनी आपली भूमिका घेत आगामी विधासभेत ‘राज ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी एकत्र येऊन सत्ताधारी भाजपाला शह देण्याची भूमिका घेतली आहे, जर सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेला पराभव करायचं असेल तर विरोधकांनी एकत्र येण्याची गरज आहे असं राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर मनसेला महाआघाडीत घेण्यासाठी राजू शेट्टी यांनी पुढाकार घेतला असून महाआघाडीत मनसे एकत्र येईल की नाही हे अजून गुलदस्त्यात आहे. मात्र राजू शेट्टीनी मनसेला सोबत घेण्याचे जाहीर केले आहे