पंतप्रधान मोदी वाराणसीतून २६ एप्रिलला अर्ज भरणार

17Shares
उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून लोकसभा जागेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ एप्रिल रोजी अर्ज भरणार आहेत.यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी रोड शो देखील करणार असून त्यात भाजप शासित राज्यातील मुख्यमंत्र्यांसह बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार देखील सहभागी होणार असल्याचे समजते.

दरम्यान यावेळी मोदींचा रोड शो १० किलोमीटरपर्यंत निघणार आहे. त्याआधी मोदी २५ एप्रिल रोजी गंगा पूजा आणि आरती सोहळ्यात सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे. याआधी २०१४ मध्ये देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रोड शो केला होता . यावेळी या रोड शो मध्ये केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, सुषमा स्वराज, पीयूष गोयल हेदेखील सहभागी होणार आहेत.