धनंजय मुंडे तोडपाणी करतात – पंकजा मुंडे

60Shares

धनंजय मुंडे आणि त्यांचे आमदार तोडपाणी करतात, तोडपाणी करणारे हे गोपीनाथ मुंडेंचे वारस होऊ शकत नाहीत अशी घणाघाती टीका ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली आहे. त्या परभणीत युतीचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारासाठी जिंतूर येथे घेतलेल्या सभेत बोलत होत्या.
गोपीनाथ मुंडे जेव्हा विरोधी पक्षनेते होते. तेव्हा त्यांनी सत्तेतल्या सरकारला जेरीस आणलं होतं,पण आताचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे एकीकडे मंत्र्यांच्या विरोधात लक्षवेधी लावतात आणि दुसरीकडे सेटिंग करतात. असा गंभीर आरोप पंकजा मुंडे य़ांनी केला आहे.
परभणी जिल्ह्यात गोपिनाथ मुंडे यांना माणनारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी या ठिकाणी आज सभा घेतली. यावेळी पंकजा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर तोडपाणी करत असल्याचे गंभीर आरोप केले असून यावर धनंजय मुंडे काय बोलणार पाहाणं महत्वाचं आहे.