Home > News Update > पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल नाही ;दोन महिन्यांपासून दर स्थिर

पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल नाही ;दोन महिन्यांपासून दर स्थिर

भारतीय तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. IOCL च्या माहितीनुसार, आजही पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. मागील दोन महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.

पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल नाही ;दोन महिन्यांपासून दर स्थिर
X

मुंबई // भारतीय तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. IOCL च्या माहितीनुसार, आजही पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. मागील दोन महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.

भारतीय तेल कंपन्यांनी 04 डिसेंबरपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतींत बदल केलेला नाही. मात्र, इंधन दरात आधीच प्रचंड वाढ झाली असल्याने सर्वसामान्य त्रस्त आहेत. केंद्र सरकारनं दिवाळीपूर्वी पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यामुळे देशभरातील पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळालं होतं. नंतर अनेक राज्यांनी पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करत सर्वसामान्यांना दिलासा दिला होता. मात्र, महाराष्ट्रात कर कपात करण्यात आलेली नाही.

IOCL च्या अधिकृत वेबसाईटवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, आज मुंबई शहरांत पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 94.14 रुपये प्रति लिटर इतकी आहे. तर पुण्यात पेट्रोलची किंमत 109.45 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 92.25 रुपये प्रति लिटर इतकी आहे.तिकडे दिल्लीत पेट्रोलची किंमत 95.41 रुपये प्रति लिटर, तर डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रति लिटर इतकी आहे. याशिवाय चेन्नईत पेट्रोल 101.40 रुपये प्रति लिटरनं आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर कोलकातामध्ये डिझेलची किंमत 89.79 रुपये आणि पेट्रोल 104.67 रुपयांनी विकलं जात आहे.

Updated : 4 Jan 2022 2:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top