Home > News Update > Sangli : संपूर्ण कुटुंबाला करंट देऊन मारण्याचा कट उधळला

Sangli : संपूर्ण कुटुंबाला करंट देऊन मारण्याचा कट उधळला

Sangli : संपूर्ण कुटुंबाला करंट देऊन मारण्याचा कट उधळला
X

सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यात असणाऱ्या वांगी येथे संतापजनक घटना घडली आहे. सुरज निकम आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला संपविण्याचा कट उघड झाला आहे. सुरज निकम यांचे शेतात घर आहे. या घराजवळ अतीउच्च विद्युतदाब असणारा ट्रांसफॉर्मर आहे. काही अज्ञात इसमांनी या ट्रांसफॉर्मरमध्ये तार जोडून त्याचे एक टोक घराच्या दरवाज्याला जोडले होते. दोरीच्या सहाय्याने ट्रांसफॉर्मर सुरु करायचा आणि घातपात घडवायचा असा कट आखण्यात आला असल्याची माहिती सुरज निकम यांनी दिली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास ट्रांसफॉर्मरचा चाप ओढल्याने तारांवर अचानक लोड येऊन ट्रांसफॉर्मरमध्ये स्फोट झाला. त्यामुळे वीज गेली. आवाजाने त्यांच्या घरातील कुटुंबीय बाहेर आले. परंतु त्यावेळी वीज नसल्याने सर्वजन बचावले. अंधाराचा फायदा घेऊन अज्ञातांनी शेतातील पिकातून पळ काढल्याचे निकम यांना जाणवले. या घटनेनंतर अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चिंचणी वांगी पोलीस करत आहेत.

Updated : 4 Oct 2023 12:10 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top