Home > News Update > शेकाप नेत्या, माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे निधन

शेकाप नेत्या, माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे निधन

शेकाप नेत्या, माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे निधन
X

रायगड : शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे शुक्रवारी (29 मार्च ) निधन झाले. त्यांच्यावर आज दुपारी पेझारी येथे दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अलिबाग विधानसभा मतदार संघाच्या त्या तीन वेळा आमदार होत्या. 1999 मध्ये तत्कालीन विलासराव देशमुख सरकारमध्ये त्या राज्यमंत्री म्हणून कार्यरत होत्या.

शेकापचे आ. जयंत पाटील, माजी आमदार पंडित पाटील यांच्या त्या भगिनी होत. तर शेकाप नेते आस्वाद पाटील यांच्या त्या मातोश्री होत.

मीनाक्षी पाटील यांच्या निधनाबद्दल राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातून शोक प्रकट केला जात आहे. एक अभ्यासू नेत्या अशी त्यांची ख्याती होती.शेकाप पक्ष संघटना मजबुती सह शेतकरी, श्रमिक, कामगारांच्या आंदोलनाला त्यांनी बळ दिल होत, त्यांच्या निधनाने शेतकरी कामगार पक्षासह सामाजिक चळवळीची मोठी हाणी झाली आहे.

Updated : 29 March 2024 5:32 AM GMT
Next Story
Share it
Top