Home > News Update > देशाचे लष्करी सामर्थ्य आणि एकात्मतेचे राजपथावर दर्शन!

देशाचे लष्करी सामर्थ्य आणि एकात्मतेचे राजपथावर दर्शन!

देशाचे लष्करी सामर्थ्य आणि एकात्मतेचे राजपथावर दर्शन!
X

देशाचा ७३ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होतो आहे. दिल्लीमध्ये राजपथावर देखील मोठ्या उत्साहात आणि दिमाखात प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा झाला. दरवर्षीपेक्षा अर्धा तास उशिराने सुरू झालेल्या या कार्यक्रमाच्या सुरूवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर जाऊन शहीदांना आदरांजली वाहिली. त्यानंतर राष्ट्रपतींच्या उपस्थितीत ध्वजवंदन सोहळा पार पडला.

यानंतर राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्य पुरस्कारांचे वितरण कऱण्यात आले. देशासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या सैनिकांचा सन्मान करण्यात आला. यानंतर झालेल्या परेडमध्ये देशाच्या लष्करी ताकदीचे दर्शन संपूर्ण देशाला झाले. कोरोना नियमांचे पालन करत हा संपूर्ण सोहळा सुरू आहे. लष्करी सामर्थ्यांचे दर्शन झाल्यानंतर राजपथावर देशातील विविधतमधील एकतेचे दर्शन देखील चित्ररथांच्या निमित्ताने होणार आहे. यामध्ये देशातील २१ राज्यांच्या चित्ररथांचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाचा देखील समावेश आहे. 'महाराष्ट्राची जैवविविधता व मानके' या विषयावरील हा चित्ररथ आहे. यंदा पश्चिम बंगालच्या चित्ररथाला तांत्रिक कारणांमुळे परवानगी नाकारण्यात आली होती.




Updated : 26 Jan 2022 5:42 AM GMT
Next Story
Share it
Top